पावसाळ्यात केसांची काळजी

रेशमी आणि दाट केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. पण पावसात केस भिजल्यानंतर केसांचे सौंदर्य काहीसे लपून राहते. अशा वेळी काही साध्या बाबी ट्राय केल्यास केसांचे सौंदर्य पावसाळ्यातही टिकून राहते.

केस पावसात भिजल्यानंतर आंघोळ करून केस व्यवस्थित टॉवेलने कोरडे करून घ्या. हेअर ड्रायर तुमच्या मर्जीनुसार वापरा. केसांना स्कॅल्प स्केलर लावा आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. स्कॅल्प स्केलर हा शॅम्पूचा प्रकार आहे.

केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर वापरा आणि 2 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. ऍप्पल सायडर व्हिनेगर केसांसाठी खूप फायदेशीर असतं. केस धुण्याआधी 5 मिनिटांपूर्वी केसांना ऍप्पल साइडर व्हिनेगर लावा.

डोक्‍यावर तेल लावून आपल्या बोटांनी हळुवार मालिश करावी. केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या वाफाळता टॉवेल दोन ते तीन मिनिटे डोक्‍याभोवती गुंडाळून ठेवावा.

केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा. अशा काही बाबी ट्राय केल्यास पावासाळ्यातही केस शानदार दिसतील. केस व्यवस्थित कव्हर करून, केस पावसात भिजू न देता पावसात स्वच्छंद भिजा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.