अनेक मतदारांचा हिरमोड

पिंपरी – निवडणूक आयोगाकडून मतदारांना वाटण्यात येणाऱ्या स्लिपचे वाटप पूर्णपणे झाले नसल्याचे सोमवारी (दि. 21) दिसून आले. अनेक मतदारांपर्यंत स्लिप पोहचल्यात नाहीत. त्यामुळे कोणत्या बूथवर मतदान करायचे याचा मतदारांचा गोंधळ उडाला. रविवारी पाऊस असल्यामुळे स्लिप पोहोचविण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्र स्थलांतरित केली असल्याने देखील मतदारांचा गोंधळ उडाला.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही आणि मावळ विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे स्लिपचे पुर्णपणे वाटप झाले नसल्याचे दिसून आले. अनेकांपर्यंत मतदान स्लिप मिळाली नाही. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला.

अनेकदा मतदारांना आपला मतदार क्रमांक माहीत नसतो, तर कोणत्या बूथवर मतदान करायचे, याची माहिती नसते. यामुळेच निवडणूक आयोगाकडून मतदारांना बूथ आणि मतदार क्रमांकाची माहिती आधीच घरपोच दिली जाते. परंतु, अनेक मतदारांना स्लीप मिळाल्या नाहीत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला अनेक मतदान केंद्र स्थलांतरित केली आहेत. त्यामुळे देखील मतदारांचा गोंधळात भर पडत होती.

सात “व्हीव्हीपॅट’ मशीन बदलल्या
मतदान सुरु असताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील सात ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदानाचा खोळंबा झाला. मात्र, काही वेळेतच तात्काळ मशीन बदलून मतदान प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आली. चऱ्होली, दिघी रोड, आदर्शनगर, दिघी, म्हेत्रे वस्ती, कुदळवाडी, तळवडे गावठाण, दिघी रोड येथील मशीन बदलल्या.

कर्मचाऱ्यांसोबत मतदारांची “शाब्दिक चकमक’
तीनही मतदार संघांमध्ये कमी-अधिक प्रमाणात व्होटर स्लिपचे वाटप झाले होते. परंतु बहुतेक व्होटर स्लिपवर मतदानासाठी देण्यात आलेला मतदान केंद्रातील खोली क्रमांक आणि मतदानासाठी गेल्यानंतर देण्यात तिथे असलेले खोली क्रमांक वेगळे असल्यामुळे कुठल्या बूथबाहेर रांगेत उभे राहावे, हे मतदारांना कळत नव्हते. सांगवी, निगडी प्राधिकरण या भागांमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवली. काही ठिकाणी आपले मतदान असलेले बूथ मिळत नसल्याने मतदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)