कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड या परिसरामध्ये मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. संपूर्ण परिसर काळ्या ढगांनी व्यापल्यानंर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी गारपीटही मोठ्या प्रमाणावर झाल्याने नागरिकांनी अक्षरश: भर पावसात गारा गोळा करण्यासाठी गर्दी केली होती.
ग्रामीण भागातील रस्ते हे गारांच्या खचांनी पांढरेशुभ्र झालेले पाहायला मिळाले. पुढील तीन तास असाच पद्धतीचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात राहील, असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे. या पावसामुळे उन्हाळ्याची काहिली होणाऱ्या कोल्हापूरकरांना मात्र थोडा दिलासा मिळाला आहे. तर याच भागातील आंबा आणि काजू पिकांचे मात्र नुकसान होणार आहे.