टेरर फंडिंग प्रकरणी हाफिज सईद दोषी

लाहोर – दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आरोपावरून जमात उद दवा संघटनेचा प्रमुख व मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईद याला येथील दहशतवाद विरोधी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

हाफिज बरोबरच त्याचे साथीदार हाफिज अब्दुल सलमान मुहंमद, मुहंमद अश्रफ, आणि जफर इक्‍बाल यांनाहीं दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर या प्रकरणात स्वतंत्रपणे खटला चालवला जाणार आहे. त्याने लाहोर, गुजरानवाला, मुलतान येथून दहशतवादासाठी पैसा गोळा केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने त्यात तथ्य आढळल्याने त्यांच्यावर आता या खटले चालवले जाणार आहेत. त्यांच्यावर आज आरोप निश्‍चिती करण्यात आली असून त्यांच्यावरील आरोपपत्रांच्या प्रतीही या आरोपींना देण्यात आल्या आहेत. दहशतवादाच्या नावाखाली पैसा गोळा करून त्यांनी स्वत:च्या मालमत्ता वाढवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर आता रितसर खटले चालणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.