हाफिज सईदच्या कोठडीला मुदतवाढ

लाहोर: मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला दिलेल्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाकिस्तानातल्या गुजरनवाला येथील दहशतवाद विरोधी न्यायालयाने 14 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. संयुक्‍त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्या हाफिज सईदवर अमेरिकेने 1 कोटी डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.

दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याच्या आरोपाखाली सईदला 17 जुलैला अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी सईद लाहोरवरून गुजरेनवाला येथे गेला होता. मात्र त्याच दिवशी त्याला दहशतवाद विरोधी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि 7 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्याला आज पुन्हा न्यायालयात आणण्यात आले आणि त्याच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. आता 7 ऑगस्ट रोजी सईद विरोधातील पूर्ण आरोपत्र सादर करण्यात यावे, अशी सूचना पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी विभागाला (सीटीडी) न्यायालयाने केली आहे.

“सीटीडी’ने पंजाब प्रातातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करण्याबाबत “जमात उद दावा’च्या 13 बड्या नेत्यांसह सईदवर 23 “एफआयआर’ दाखल केल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सईदच्या अटकेचे स्वागत केले आहे. गेल्या दोन वर्षात अमेरिकेने पाकिस्तानवर आणलेल्या दबावामुळेच ही अटक झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिका, संयुक्‍त राष्ट्र आणि अन्य आंतररष्ट्रीय दबावामुळे पकिस्तानने लष्कर ए तोयबा, जमात उद दावा आणि फतेह ए इन्सानियत फौंडेशन या दिखाऊ संघटनांच्या अर्थकारणाचा तपास सुरू केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)