कोरोनाचा हैदोस! देशात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ; मृतांची संख्याही आठशेच्या पार

नवी दिल्ली : करोनाने पुन्हा एकदा देशात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा या वेग प्रचंड असल्याचे दिसत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली झाली आहे. देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचेच चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.

देशात १,५२,८७९ जणांना करोनाची लागण झाल्याची समोर आलं आहे. दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे.

देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.