हडपसर : चेतन तुपे यांच्या रूपाने अभ्यासू व कर्तव्यनिष्ठ नेतृत्व पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याची संधी चालून आलेली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी सर्व मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून देऊन हडपसरच्या सर्वांगीण विकासाची संधी द्यावी. असे आवाहन महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. साडेसतरानळी, माळवाडी, आनंदनगर येथे पदयात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली.
हडपसर विधानसभेतील या भागातील नागरिकांशी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी संवाद साधला. नागरिक हक्काने येऊन आपले म्हणणे मांडत होते, उत्साहाने सहभागी होत चेतन तुपेंना पाठींबा देत होते. हडपसरच्या मातीतले हक्काचे नेतृत्व आमदार चेतन तुपे यांच्या रूपाने विधानसभेत पाठवणार, असा विश्वास साडेसतरानळी, माळवाडी, आनंदनगर व समस्त हडपसर करांनी तुपे यांना दिला.
हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे असे आवाहन जनतेला करून घड्याळ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन चेतन तुपे यांनी केले.यावेळी या परिसरातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान मुंढवा, केशवनगर बधे वस्ती भागातल्या बाईक रॅली आणि पदयात्रेसाठी. मुंढवा ,बधेवस्ती ,केशवनगर तसेच लक्ष्मी कॉलनी, विठ्ठल नगर, १५ नंबर, सातव प्लॉट, पारिजातक प्लॉट, साधना सोसायटी, कुबेरा संकुल, कुबेरा विहार, कामधेनू इस्टेट, भोसले गार्डन, लोहिया नगर या भागातील मतदार व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे माहितीचे आमदार चेतन तुपे यांचे स्वागत केले त्यांचे औक्षण करत विजयासाठी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी ,माजी नगरसेवक शिवाजी भाऊ पवार, माझे स्वीकृत नगरसेविका संजीवनी ताई जाधव, बाळासाहेब दौंडकर, गणेश घुले ,गजानन भाऊ तुपे, नरेंद्र सावंत,मंगेश जी केंद्रे ,वाल्हेकर काका, इम्तियाज मोमीन, जयप्रकाश जाधव, सुभाष आरोळे, संतोष दळवी, मयूर तुपे अविनाश तुपे ,रुपेश तुपे ,संदीप शिंदे अमृतपे कालिदास इंगळे मीनाक्षी अहिरे, वायजी पवार, महायुतीचे पदाधिकारी, नेते, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.