हडपसर मतदारसंघाला मुबलक पाणी देणार 

हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असून, यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांनी आघाडी घेतली आहे.

घनश्‍याम बापू हाके यांच्याकडून प्रचारात कोणत्याही प्रकारची कसर ठेवली जात नसून, गल्लोगल्ली, चौकाचौकात प्रचार करता यावा या हेतूने आज हडपसर-काळेपडळ भागातून सायकलवरून प्रचार करत गॅस-सिलिंडर चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष पितांबर धिवार, बाळासाहेब हजारे, बालाजी सलगर, अण्णा दाईंगडे, सुभाष आप्पा घोडके, उमेश शेंबडे, सोमनाथ लोंढे, धर्मराज लांडगे, अतिश आलटे, सचिन जोग, प्रवीण करे, पराग बरकडे, सुनील गजरे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काळेपडळ भागात सर्वत्र अस्वच्छता बघायला मिळते. येथे डुकरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे दिसते तेथेच ते घाणही करतात. त्यामुळे दुर्गंधी होते. मोकाट डुकरे इमारतीमध्येही ये-जा करतात. या डुकरांचा योग्य बंदोबस्त करू, याशिवाय या भागाला मुबलक पाणी देऊ,असे आश्‍वासन हाके यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.