हडपसर : समाविष्ट गावांना नगरसेवक नाना भानगिरेंच्या स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी

हडपसर(प्रतिनिधी)  : प्रभाग क्रमांक २६ काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक प्रमोदनाना वसंत भानगिरे यांच्या विकास निधीतून मुख्य टाकीपासून ते नेहरू पार्क व साई विहार कॉलनी मध्ये मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या हेतूने मोठ्या व्यासाचा पिण्याचा पाण्याची लाईन, अष्टविनायक कॉलनी मध्ये नविन ड्रेनेज लाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ या भागातील जेष्ठ नागरिक व महिलेच्या हस्ते संपन्न झाला.

नगरसेवक प्रमोदनाना वसंत भानगिरे यांच्या स्वखर्चाने हांडेवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी, काळेपडळ, संपूर्ण हांडेवाडी रोड या ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याचा टँकरचा शुभारंभ परिसरातील जेष्ठ मंडळी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या वेळी नव्याने समाविष्ट झालेल्या सर्व गावाचे सरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते नाना भानगिरे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

“नव्याने समाविष्ट गावांमध्ये तात्पुरता टँकरद्वारे पाणी पुरवठा तातडीने सुरू केला आहे. या गावांमधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून योजना राबविणार आहे तसेच येथील नागरी प्रश्न सुटण्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली जाईल गावांच्या विकासाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
– प्रमोद नाना भानगिरे(नगरसेवक, पुणे मनपा)

यावेळी उल्हास शेवाळे, उपसरपंच हिम्मत हांडे, अभिमन्यू भानगिरे, सरपंच प्रज्ञा झांबरे, उपसरपंच राकेश झांबरे, श्रद्धा झांबरे, दत्तात्रय होळकर, विश्वास झांबरे, नाना साहेब पठारे, सोमनाथ होळकर, माजी उपसरपंच पांडुरंग औताडे, गणेश शेवाळे, संदिप बांदल, विकास शेवाळे, लक्ष्मण झांबरे, सोमनाथ धनवडे, सुभाष थिटे, संदीप औताडे, अजय झांबरे, मानसी झांबरे, रोहिणी चौधरी, रामचंद्र झांबरे, व सर्व ग्रामस्थ, महिला, अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.