हडपसर(प्रतिनिधी) :- उरुळी देवाची आणि फुरसुंगी नगरपालिकेला ‘ड’ दर्जा मिळेल, निधी मिळणार नाही, त्यासाठी उपनगरालगतच्या पूर्व भागातील गावांचा विकास होण्यासाठी स्वतंत्र हडपसर महानगरपालिका झाली पाहिजे. जर महानगरपालिका झाली तर त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पुरेसा निधी दिला पाहिजे, असे स्पष्ट मत माजी आमदार महादेव बाबर यांनी मांडले.
यावेळी माजी आमदार महादेव बाबर, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, पुणे शहर सरचिटणीस समीर तुपे आणि हडपसर विधानसभा उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
माजी आमदार बाबर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांची नगरपालिकेला मंजुरी दिली. मात्र, पूर्व हवेलीतील सर्व गावे एकत्र करून महानगरपालिका करून दहा कोटींचा निधी विकासासाठी दिला पाहिजे. कात्रज, उरुळी कांचन, वाघोली, लोणीकंद सर्व बारा वाड्या व सर्व गावे एकत्र करून नवीन महापालिका झाली, तर गावचा विकास होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
Liver detox : ‘असे’ करा लिव्हर डिटॉक्स! अनेक गंभीर समस्यांचा धोका होईल कमी
पुणे शहर सरचिटणीस समीर तुपे म्हणाले की, मगरपट्टा चौकात महापालिकेचे कै. अण्णासाहेब मगर प्रसूतीगृह सुरू करण्याकरिता शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा पत्र व्यवहार व आरोग्य अधिकाऱ्या सोबत बैठका घेऊन गरजू गरोदर महिलांची गैरसोय होत आहे, त्यामुळे पालिकेने प्रसूतिगृह सुरु करण्याची मागणी केली होती. अनेक वर्षापासून बंद असलेले प्रसूतीगृह हे शिवसेनेच्या मागणीमुळे सुरू झाले आहे. त्याचबरोबर करोना काळात स्थलांतरित झालेले मगर रुग्णालय पुन्हा येथे सुरु करणे आणि चोवीस तास मयत पास देण्याचे काम हे सुद्धा आमच्या पाठपुराव्याने सुरु झाले आहे. असे समीर तुपे व महेंद्र बनकर यांनी सांगितले.