हडपसर – भाजपच्या पदाधिकारी स्मिता तुषार गायकवाड यांचा वाढदिवस व स्मितसेवा फौंडेशन याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला होता तसेच कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला.
नोकरी महोत्सवाचे उद्घाटन भाजपा शहर अध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर होते.
नोकरी महोत्सव समारोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेविका उज्वला जंगले, राहुल शेवाळे, तुषार गायकवाड, जीवन जाधव, अभिजीत बोराटे, बाळासाहेब घुले, डॉ अशोक सोरगावी, राहुल भंडारे, शैलेंद्र बेल्हेकर स्मितसेवा फाउंडेशन सदस्य, अस्तित्व कला मंच चे सदस्य, यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान यशस्वी उद्योजक महिलांचा “स्मितसेवा यशस्वी महिला उद्योजिका सन्मान पुरस्कार” देऊन त्यांना गौरविण्यात आले.