हडपसर – येथील एस .एम .जोशी महाविद्यालय येथे मुंबई हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मृती निमित्त आज सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हडपसर, लोणी काळभोर, मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीसमित्र, परिवार अशा 131 लोकांनी शिबिरात रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील , सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते , लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी तसेच हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अरविंद गोकुळे, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र अडागळे , दिगंबर शिंदे यांचे उपस्थितीत झाले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार चेतन तुपे पाटील आणि प्राचार्य चंद्रकांत खिलारे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रक्तदात्यांचे स्वागत केले.
डॉ शंतनू जगदाळे आणि हडपसर पोलीस स्टेशन च्या सर्व स्टाफ ने रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. दरम्यान रक्तदान केलेल्या 131 रक्तदात्यां प्रमाणपत्रे आणि हेल्मेट भेट देण्यात आली.