पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्हा प्रशासनाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 84 लाख 39 हजार 729 इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वांत मोठा मतदारसंघ हा चिंचवड असून, या मतदारसंघात 6 लाख 27हजार 437 मतदार अहेत.
तर सर्वात लहान मतदारसंघ हा कसबा पेठ असून या मतदारसंघात 2 लाख 78 हजार 606 मतदार आहेत. दरम्यान, पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून शहरात सर्वांत मोठा मतदारसंघ हा हडपसर असून या मतदारसंघात 5 लाख 90 हजार 911 मतदार आहेत.
जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे लोकसभेच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत 3 लाख 12 हजार 710 ने वाढ झाली आहे. या प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने २० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत.
यादरम्यान मतदार यादीत नाव नसल्यास नोंदणीसाठी अर्ज नमुना क्रमांक ६, नाव समाविष्ट करण्यास हरकत, यादीत यापूर्वीच समाविष्ट असलेले नाव वगळणे, स्थलांतर झाल्यामुळे नाव वगळणे आदींसाठी नमुना क्र. ७, पत्ता बदल, तपशीलात दुरुस्ती, दुबार ई-पिक कार्ड मिळणे आदींसाठी नमुना क्र. ८ हे अर्ज ऑनलाइन भरता येतील.
त्याशिवाय संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक पुराव्यांसह अर्ज सादर करता येतील, असेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघ
विधानसभा – मतदारांची संख्या
वडगावशेरी – 4,76,538
शिवाजीनगर – 2,81,831
कोथरुड – 4,21,079
खडकवासला -5,45,893
पर्वती – 3,44,739
हडपसर – 5,90,611
पुणे कॅन्टोन्मेंट – 2,86,518
कसबा पेठ -2,78,606
पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदारांची संख्या
चिंचवड – 6,27,437
पिंपरी -3,77,251
भोसरी -5,58,959
ग्रामीण भागात विधानसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदारांची संख्या
जुन्नर – 3,14,839
आंबेगाव – 3,04,266
खेड-आळंदी – 3,57,105
शिरूर – 4,45,300
दौंड – 3,07,042
इंदापूर – 3,25,540
बारामती – 3,71,577
पुरंदर – 4,36,414
भोर वेल्हा मुळशी- 4,12,414
मावळ -3,75,770