कोंढवा – हडपसर मतदार संघाचा सर्वांगिण विकास माजी आमदार महादेव (आण्णा) बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली साधणार असल्याचे मी केवळ आश्वासन देत नाही तर, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून वचन देत असल्याचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी सांगितले. जनसमुदाय पाहता माझा विजय निश्चित आहे, असा विश्वासही गंगाधर बधे यांनी व्यक्त केला.
हडपसर मतदार संघात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मंगळवारी निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली रामटेकडी येथील साईबाबा मंदिर या ठिकाणाहून पदयात्रा व दुचाकी रॅलीला सुरवात करण्यात आली. दरम्यान, ही रॅली रामनगर अंधशाळा, पुढे अण्णाभाऊ साठे उद्यानापासून भुयारी मार्गाद्वारे गोसावी वस्ती, म्हाडा कॉलनी, वैदुवाडी यानंतर पुढे शंकर मठ वस्ती मधून मगरपट्टा चौकातून हडपसर,ससाणेनगर आदी भागातून आली.
यावेळी हजारो महिला व युवक सहभागी झाले होते. यावेळी रामटेकडी प्रभाग प्रमुख यशवंत मंडलिक, सुरज चव्हाण, प्रेम कसबे, बालाजी उदारे, तुषार झोंबाडे, रवी तुजारे, तोसिफ पटेल, हर्षल मंडलिक, मीना शिंदे, लिंबाजी फडके, शिवाजी भोसले, यश चव्हाण, तुषार बल्लाळ, संतोष शिंदे, सुशील मोरे,मयूर शिंदे, गणेश पवार, रोहन लाकडे गणेशं शिंदे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, निष्ठावंत आणि सच्चा कार्यकर्त्यांच्या मागे मी उभा आहे, हडपसरची जनता ही आपला हक्काचा माणूस अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना निवडून देणार यात शंका नाही, असे माजी आमदार महादेव (आण्णा) बाबर यांनी सांगितले.