हडपसर – हडपसर विधानसभा मतदार संघ भाजप महिला आघाडी कार्यकारिणी हडपसर महिला अध्यक्षा स्वाती प्रमोद कुरणे यांनी जाहीर केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत उपाध्यक्ष ८, सरचिटणीस ३, चिटणीस ५ यांचा समावेश आहे.
या कार्यकारिणीत शारदा पानमन,कल्पना शेलार, मेनका उमडेकर, संजना शर्मा, शोभा डावरे , मोहिनी शिंदे , नूतन पासलकर, अश्विनी सूर्यवंशी यांना उपाध्यक्षपदाची तर
छाया गदादे,रेखा माने, शोभा लगड यांना सरचिटणीस पदाची संधी मिळाली आहे.
‘ शत प्रतिशत हडपसर ‘
हडपसर विधानसभा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होत असून महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात सर्व जागा भाजपला मिळविण्यासाठी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते मंडळी ,शहराध्यक्ष तसेच ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश आण्णा टिळेकर , मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने ही महिला कार्यकारिणी ‘शत प्रतिशत हडपसर ‘ साठी काम करेल असा विश्वास आहे.
– स्वाती प्रमोद कुरणे (अध्यक्षा – भाजपा महिला आघाडी, हडपसर)
कार्यकारिणीत चिटणीस म्हणून उज्वला चव्हाण, छाया दांगट, सुनीता रायकर, निकिता निगाले, मोनाली हिंगणे यांची निवड झाली आहे.मतदार संघाचे माजी आमदार व ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली व हडपसर विधानसभा अध्यक्ष संदिप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निवडण्यात आली असून एका जाहीर कार्यक्रमात निवड झालेल्या महिला पदाधिकारी यांना शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी संघटन सरचिटणीस गणेश घोष, संदीप लोणकर ,उपाध्यक्ष भूषण तुपे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती कुरणे, नगरसेविका रंजना टिळेकर, संध्या टिळेकर, नगरसेविका वृषाली कामठे, उज्वला जंगले, मनीषा कदम आदींसह शहर भाजपा व हडपसर विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते.