प्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत

मुंबई – तान्हाजी चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत आता आणखी एका धमाक्यासाठी सज्ज झाले आहेत. बाहुबली स्टार प्रभास आणि ओम राऊत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दुर्गुणांवरील सद्गुणांच्या विजयाभोवती फिरणाऱ्या हिंदुस्थानी या महाकाव्याचे चित्रपट रूपांतर असून यात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बाहुबलीनंतर प्रभास पुन्हा एपिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटात रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही. ​प्रभास प्रभु श्रीरामच्या भूमिकेत तर क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सैफअली खान रावनची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, चित्रपटात हनुमानच्या भूमिकेसाठी कोणता कलाकार झळकणार याविषयीही चर्चा रंगल्या होत्या. तर ‘जय मल्हार’ फेम अभिनेता ‘देवदत्त नागे’ हनुमानच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी देवदत्तही प्रचंड मेहनत घेत आहे. सोहळा मीडियावर त्याने वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ फोटो शेअर केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.