‘हा’ मराठी कलाकार करणार ‘सडक 2’मध्ये काम

मुंबई – संजय दत्त आणि पूजा भट यांचे लीड रोल असलेल्या 90 च्या दशकातील सुपरहिट “सडक’चा रिमेक असलेल्य “सडक 2’चे शुटिंग मे महिन्यात सुरू होणार झाले आहे. आलिया लीड रोल साकारत असेल, तर तिच्याबरोबर प्रथमच महेश भटदेखील सिनेमात काम करणार आहेत. “सडक’ प्रमाणेच “सडक 2’चे डायरेक्‍शनदेखील महेश भट करणार आहेत. आलिया आणि आदित्य रॉय कपूर हे याचे लीड ऍक्‍टर्स असणार आहेत. तर या चित्रपटात मराठी कलाकार मकरंद देशपांडे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.  दगडी चाळ सिनेमात त्याने साकारलेली डॅडीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘सडक 2’ चित्रपटाच्या माध्यमातून मकरंद खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्याप्रमाणे प्रेक्षकांना पहिल्या “सडक’मधील हिरो संजय दत्त आणि हिरोईन पूजा भट हे देखील या रिमेकमध्ये महत्वाचे रोल बघायला मिळतील. आलिया आणि पूजा भट आपल्या घरच्या प्रॉडक्‍शनच्या सिनेमामध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. पूजा बऱ्याच वर्षांनी एखाद्या सिनेमात काम करते आहे. आलियाबरोबरचे तिचे समिकरण भन्नाट आहे. या भगिनींचे ऑन स्क्रीन बॉन्डिंग आता पहिल्यांदा बघायला मिळेल. नवीन “सडक 2′ मध्ये “सडक’मधील “तुम्हे अपना बनाने की कसम…’ हे प्रसिद्ध गाणे नवीन स्वरुपात बघायला मिळणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.