कुमारस्वामींनी केली तारीख निश्चीत करण्याची मागणी
बंगलुरू – आपण आपल्या सरकारच्यावतीने विश्वास दर्शक ठराव मांडून त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत. त्यामुळे सभापतींनी त्यावरील मतदानाची तारीख निश्चीत करावी अशी सुचना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे. मी केवळ सत्तेला चिटकून राहण्यासाठी येथे आलो आहे. कोणत्याही परिक्षेला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन अस्थिरतेच्या वातावरणात आजपासून सुरू झाले. त्यावेळी विधानसभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या एकूण सोळा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यातील तेरा जण कॉंग्रेसचे असून उर्वरीत तीन जण जेडीएस म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आहेत.