सुईसाईड प्लांट नावाने ओळखली जाते वनस्पती
कॅनबेरा : पृथ्वीवर अनेक विचित्र प्रकारची जीवसृष्टी आढळते अनेक जीव आणि वनस्पती यांनी ही जीवसृष्टी भरून गेली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी ही जीवसृष्टी महत्त्वाची असली तरी या जीवसृष्टीमध्ये काही खतरनाक वनस्पती आढळतात.
ज्या वनस्पतींना स्पर्श करताच मनात आत्महत्येची भावना तयार होते आणि माणूस आत्महत्या करायला प्रवृत्त होतो ऑस्ट्रेलियातील घनदाट जंगल प्रदेशात सापडणारी ही वनस्पती जिमपाई नावाने प्रसिद्ध असून शास्त्रज्ञ या वनस्पतीला सुईसाईड प्लांट असेही म्हणतात. या वनस्पतीच्या पानाला किंवा कुठल्याही भागाला हात लागता तर विजेचा झटका बसल्यासारखी भावना तयार होते किंवा अंगावर ऍसिड पडल्यावर जशा वेदना होतात तशा वेदना तयार होतात या वेदना माणसाला सहन होत नाहीत आणि तो आत्महत्या करायला प्रवृत्त होतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक मरीना हरले यांनी या वनस्पतीबाबत माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे ऑस्ट्रेलियातील रेन फॉरेस्ट परिसरामध्ये संशोधन करत असताना त्यांना या वनस्पतीचा शोध लागला. त्यांना अशा प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात असल्याची माहिती होतीच त्यामुळे या जंगलात हिंडत असताना त्यांनी वेल्डिंग ग्लोज घातले होते आणि इतर सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती.
तरीसुद्धा या वनस्पतीच्या प्रदेशात संशोधन करत असताना त्यांना शारीरिक त्रास झालाच त्या जेव्हा संशोधन करून परत आल्या तेव्हा त्यांचे संपूर्ण शरीर लाल झाले होते आणि त्यांना वेदनाही सहन होत नव्हत्या.
या वेदना सहन व्हाव्यात म्हणून त्या दीर्घकात रुग्णालयात भरती झाल्या आणि अनेक उपचारानंतरच त्या बऱ्या झाल्या. या वनस्पतीचे जीवशास्त्रीय नाव रॉकनाईट मोरोइड्स असे आहे ही प्राण घातक वनस्पती ऑस्ट्रेलियातील रेन फॉरेस्ट प्रदेशाप्रमाणेच इंडोनेशिया आणि मोरोक्को या देशांमध्ये सुद्धा आढळते.