ट्रॅम्पोलिंग, टंबलिंग जिम्नॅस्टिकमध्ये विद्यार्थ्यांचे यश

धनकवडी – सहकारनगर येथील मुक्‍तांगण शाळेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या 6 विद्यार्थ्यांनी 9व्या सिनीअर, ज्युनिअर, सब ज्युनिअर ट्रॅम्पोलिंग, टंबलिंग जिम्नॅस्टिक नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत यश मिळवले.

महाराष्ट्र हौजिंग जिम्नॅस्टिक संघटना आणि जिम्नॅस्टिक असोसिएशन, ठाणे यांच्या वतीने डोंबिवली येथील श्रवण स्पोर्टस्‌ ऍकॅडमीमध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत 10 राज्यातून 200 जिम्नॅस्टिक खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये स्पोर्टस्‌ ऍथोरेटी ऑफ इंडिया (साई)मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या 17 वर्षांखालील ट्रम्पोलिंग जिम्नॅस्टिक प्रकारामध्ये साहिल मरगजे, अन्यया भूतकर तर 14 वर्षांखालील ट्रॅम्पोलिंग प्रकारात गणेश वाल्मिकी, सिद्धार्थ भुटाला, प्रज्ञा धुमाळ, शत्काक्षी टक्‍के सहभागी झाले होते.

अन्यया भुतकर आणि गणेश वाल्मिकी यांनी आपल्या गटात सुवर्णपदक मिळविले. शत्काक्षी टक्‍के, साहिल मरगजे, प्रज्ञा धुमाळ यांनी सिल्व्हर पदक मिळविले. हे सर्व राज्यस्तरीय खेळाडू “साई’चे माजी प्रशिक्षक रवींद्रनाथ मंगला, प्रशिक्षक येलोरा मंगला, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक व श्री छत्रपती पुरस्कार विजेते हर्षद मोघे व आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक व श्री. छत्रपती पुरस्कार विजेत्या रुचा दिवेकर व प्राजंल वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्‍तांगण शाळेतील जिम्नॅस्टिक हॉलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.