बंगळुरु – जिममध्ये अति व्यायाम केल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगचे आकर्षण असल्याचे सध्या दिसून येते. मात्र हे धोकादायक असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.
बंगळुरु मधील एका तरुणाचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अति व्यायाम केल्याने त्यास हार्ट अटॅक येऊन तो जागेवरच कोसळला आहे.
https://www.instagram.com/tv/CTRrigZl6Or/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडीओमध्ये हा तरुण जिममधून बाहेर येऊन पायऱ्यांवरती बसतो. त्याला छातीत थोडे दुखू लागते, ज्यामुळे तो हळूहळू पाणी पितो आणि नंतर पुन्हा उभा राहून छाती दाबण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरीही त्याला कसे तरी होत असते, म्हणून तो पुन्हा खाली बसतो आणि पाणी पितो.
त्यानंतर हा तरुण परत उठून आत जिममध्ये जातो. परंतु काही सेकंदानंतर तो पुन्हा जिमच्या बाहेर येतो आणि पायऱ्यांवर पुन्हा बसून हळूहळू श्वास घेण्याचा प्रयत्न करतो, पण अखेर त्याच्या वेदना वाढतात आणि तो पायऱ्यांवरुन खाली कोसळतो.
दरम्यान, कमी वयात सुद्धा हृदयाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. बदलती जीवनशैली यासाठी कारणीभूत असल्याचे यामागिल मुख्य कारण आहे.