“ज्ञानोबा-तुकोबा’च्या गजराने यवत परिसर दुमदुमला

दौंड तालुक्‍याच्या सीमेवर तुकोबांचे भव्य स्वागत

10 वर्षांनंतर बेसन-भाकरीची परंपरा खंडित

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्‍कामी असताना वारकऱ्यांना दरवर्षी यवतकर ग्रामस्थ बेसन-भाकरीचे जेवण देतात; परंतु यावर्षी एकादशी आल्याने बेसन भाकरीची परंपरा 10 वर्षांनंतर खंडित झाली. याचा खेद ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावर्षी वारकऱ्यांना 750 किलोच्या भगरीच्या भाताचे जेवण देण्यात आले.

यवत – जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्‍यात दोन दिवसांच्या मुक्‍कामासाठी बोरिभडक येथे शनिवारी (दि. 29) दुपारी
3 वाजता रिमझिम पावसाच्या सरी झेलत दाखल झाला.

पालखीचे स्वागत दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश आखाडे, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी केले. पालखी सोहळा यवत मुक्‍कामाकडे मार्गस्थ झाल्यावर पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या सहजपूर फाटा, जावजी बुवाची वाडी, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा येथे काही वेळ पालखी दर्शनासाठी थांबविण्यात आली होती. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे अबालवृद्धांनी दर्शन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.