ज्ञानदीप लावू जगी : पूर्ण होऊनि तिहीं लोकीं

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।।

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ।।

ज्ञानेश्‍वर माऊली पसायदानात म्हणतात, विश्‍वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्‍ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्‍तीकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माऊली भगवंताकडे करतात.

पुढील ओवीत माऊली म्हणतात, आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.

एकंदरित पाहिले तर जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेटतो. ग्रंथांना जीवन मानले तर जीवनच बदलून जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.