ज्ञानदीप लावू जगी : तया नाम धर्मु ठेविती

एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ।। 158 ।।

हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । विशेषें आचरावें । लागे संतीं ।। 159 ।। श्री

ज्ञानेश्‍वरी अध्याय तिसरा माऊली म्हणतात, या मृत्युलोकात थोर वडीलधारी व्यक्‍ती धर्माचा खरा अर्थ जाणून जे जे आचरण करतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे समजतात. त्याच कर्माचे ते सारासार विचार न करता आचरण करतात.

असे हे श्रेष्ठ वडीलधाऱ्या थोर व्यक्‍तीच्या आचरणाचे अनुकरण करणे सामान्य समाजाची स्वभाविक वृत्ती असल्यामुळे थोर ज्ञानी व्यक्‍तींनी स्वकर्म अनुष्ठानाचा कधीही त्याग करू नये. जनकल्याण करू इच्छिणाऱ्या साधू-संतांनी विशेष प्रयत्न करून धर्माचरण करणे आवश्‍यक आहे. कारण सामान्य लोक किंबहुना लहान मुले अनुकरणप्रिय असतात. मोठे जसे आचरण करतात तसेच्या तसे अनुकरण करण्याचा त्यांचा अट्टहास असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.