ज्ञानदीप लावू जगी : सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्‍यकें ।तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ।।

पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचें ( मार्ग चालण्याचे ) सोडता कामा नये, त्याप्रमाणे यज्ञ, दान व तप ही आवश्‍यक कर्मेही सोडू नयेत. हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा माग सोडता येत नाही; पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही;

नाव नदीचे काठास पोहोचल्याखेरीज मध्येच सोडता येत नाही, केळी आल्याशिवाय केळीची झाडे कापता येत नाहीत, ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय दिवा मालविता येत नाही.

त्याप्रमाणे, आत्मज्ञानाविषयी निश्‍चय झाला नाही तोवर योगादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान व तप यांचे यथाविधि वरचेवर आचरण केलेच पाहिजे. कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.