ज्ञानदीप लावू जगी: विठ्ठल म्हण कारे वाचा

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ।।

श्री ज्ञानेश्‍वरीतील नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात की, कोणी एखाद्याला जर “तू मर’ असे म्हटले तर ते त्या व्यक्‍तीला सहन होत नाही आणि जर कोणी मेले तर रडत बसतात.

पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे, हे त्यांना मूर्खपणामुळे समजत नाही. ठीकठाक असताना आपल्याला मरणाची आठवण होत नाही. 

मात्र, एखादी करोनासारखी महासाथ आल्यावर मरण हा काय प्रकार आहे हे कळते. राजा असो किंवा नोकर मरण हे कोणालाच चुकत नाही. 

माऊली म्हणतात, भ्रम धरीसीं या देहाचा । विठ्ठल म्हण कारे वाचा । पडोनि जाईल कलेवर । विठ्ठल उच्चारी पां सार ।। या देहाचा तुम्ही कितीही मोह धरला तरी एकदा कधीतरी मरण ठरलेले आहे. त्यामुळे सर्व नामाचे सार जे विठ्ठलनाम आहे ते तुम्ही वाचेने घेत राहा.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.