ज्ञानदीप लावू जगी : बळेंवीण शक्‍ति बोलूं नये

भावेंवीण भक्‍ति भक्‍तिवीण मुक्‍ति । बळेंवीण शक्‍ति बोलूं नये ।।

माऊली हरिपाठातील चौथ्या अभंगात ईश्‍वर भक्‍तीत भाव खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात. भावावाचून भक्‍ती व्यर्थ आहे. भक्‍ती करत असताना ती भाव ठेवून करणे महत्त्वाचे आहे. भाव धरून भक्‍ती केल्याने मुक्‍तीची प्राप्ती होऊ शकते. निर्बल व्यक्‍ती जर म्हणाली की, मी बलशाली आहे. हे त्याचे म्हणणे ज्याप्रमाणे व्यर्थ आहे.

त्याचप्रमाणे कृती शिवाय परमार्थ हा देखील व्यर्थच असल्याचे माऊली ज्ञानोबारायांसह अनेक संतांनी सांगितले आहे.

मनुष्य संसार उगीच शिणतो, काबाडकष्ट करतो. सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ।

माऊली म्हणतात, प्रपंचासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करतात, मात्र त्या भगवंताचं भजन करत नाहीत. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । माऊली म्हणतात, हरिनामाचा जप करा. त्याने काय होईल? तुटेल धरणें प्रपंचाचे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.