‘आयटी’नगरीत पोलिसांनी पकडला सहा लाखांचा गुटखा

  • महामार्गावर गस्त घालताना केली कारवाई

हिंजवडी – बेकायदेशीर गुटखा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याला पकडून त्याच्याकडून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल हिंजवडी पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी दोघांना अटक केली असून, दोघेजण फरार असल्याचे हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी एक मोबाइल, एका दुचाकी, पाच लाख तेरा हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

रामकिशोर भवरूराम चौधरी (वय 34) व त्याचा भाऊ महेंद्र भवरूराम चौधरी (वय 25) दोघेही (रा. विशालनगर, पिंपळे निलख) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर उर्वरित दीपजी राठोड व जितू भाटी हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी फिर्याद दिली आहे.
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस पथक मुबई-बंगलोर महामार्गवर गस्त घालत असताना ऍक्‍टिवा गाडीवर गुटख्याचे बॉक्‍स घेऊन जात असताना ही दुचाकी पोलिसांनी पाठलाग करून पकडली.

त्या वेळी दुचाकीस्वाराकडे चौकशी केली असता हा गुटखा सुस, म्हाळुंगे परिसरात टपरीवर विक्रीसाठी चालवला असल्याचे आरोपी रामकिशोर याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी गाडी, एक मोबाइल व गुटख्याची पोती असा मिळून पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार, यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, अजय जोगदंड (गुन्हे), तपास पथक प्रमुख सागर काटे, हवालदार पराळे, रवी पवार, हवालदार पांढरे, अली शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.