वाठार स्टेशन – वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गुटकख्याचा साठा व विक्री व्यवसाय चालू असल्याची माहिती कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने किंद्रे यांनी सातारा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी तातडीने संपर्क करून कारवाई साठी बोलून घेतले.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक सातारा, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश किंद्रे व वाठार पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी मौजे पिंपोडे बुद्रुक व पिंपोड खुर्द गावच्या हद्दीत जाऊन छापा टाकला असता पिंपोडे बुद्रुक येथील जितेंद्र नारायण पवार, दादा नारायण पवार यांच्या किराणा दुकानाचे पाठीमागेे पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा व पानमसाला असा एकूण २ लाख ३१ हजार ६१८ रुपयाचा माल मिळून आला. तसेच पिंपोडे खुर्द येथील संतोष भरत कदम याच्या एक्सयुव्ही-५०० वाहनातून (एमएच ११ बीव्ही ६७००) मध्ये ९४,०१८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा गाडीसह किंमत रुपये १०,५४,०१८/ असा दोन्ही ठिकाणी एकूण १२,८५,६३६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई ही उपअधीक्षक गणेश किंद्रे वाठारचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार कमलाकर कुंभार, साहील झारी, हेमंत शिंदे, अजय गुरव, श्रीकांत खरात, तुषार ढोपरे, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अनिल पवार, आर. आर. शहा यांनी सहभाग घेतला असून वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले तपास करीत आहेत.