fbpx

पिरंगुट येथे गुटखा पकडला, एकास अटक

लोणी काळभोर/पिरंगुट- पौड (ता. मुळशी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरंगुट येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई केली. यात अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

या प्रकरणी रामलाल छौगाजी चौधरी ( वय 43, रा. पिरंगुट कॅम्प, ता. मुळशी ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तसेच पौड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी संयुक्तपणे पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करीत होते.

 

यावेळी पुणे बाजूकडून पौड बाजूकडे एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने चालली होती. कारचा पाठलाग करून पिरंगुट गावातील लवळे फाटा येथे पकडण्यात यश मिळाले. या कारमध्ये विमल पान मसाला नावाचा सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्‍सची 4 पोती, 1 बॉक्‍स, 1 कार व 1 मोबाईल असा एकूण किंमत रुपये 2,55,060 मुद्देमाल सापडला. या कार चालकावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक फौजदार दत्ता जगताप, हवालदार राजेंद्र पुणेकर, सागर चंद्रशेखर, प्रसन्न घाडगे यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.