सात हजारांचा गुटखा वडूजमध्ये जप्त

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा छापा

वडूज  – येथील शेतकरी चौकातील अभिषेक ट्रेडर्स या दुकानावर आज पोलीस उपअधीक्षक अनिल वडनेरे यांनी छापा मारत सात हजार पाचशे रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत विजय रामचंद्र अडसूळ यांच्यावर पोलीस कर्मचारी अमोल माने यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी दि. 12 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास अनिल वडनेरे, पोलीस कर्मचारी अमोल माने, नितीन निकम, श्री. तांबे, श्री. बगे यांनी येथील शेतकरी चौकात असलेल्या अभिषेक ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला.
यावेळी या दुकानातून सात हजार पाचशे रुपये किंमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला जप्त केला. याप्रकरणी विजय रामचंद्र अडसूळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वडूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरुच
राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!