पिंपरी – संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असली तरी पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. गुटख्याच्या विरोधात पोलिसांनी आता आपला मोर्चा वळविला असून पिंपरी येथे छापा टाकून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व टेम्पो असा 10 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
बेकायदा खुटखा विक्री प्रकरणी खेमचंद रामचंद कृपलाणी (वय 50, रा. कापसेआळी, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर आरोपीचा साथीदार दिनेश तुलसीराम तीरथाणी (रा. पिंपरी) हा अद्याप फरारी आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम हे अधिक तपास करीत आहेत.