‘या’ राज्यात गुटखा, पान मसाल्यावर बंदी

डेहराडून – सरकारने राज्यात पान मसाला आणि गुटख्यावर पुर्ण बंदी जारी केली आहे. केवळ विक्रीसाठीच नव्हे साठवणूक आणि वितरण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त नितेशकुमार झा यांनी शुक्रवारी सायंकाळी ही बंदी अधिसुचना जारी केली.

गुटखा व पान मसाल्याचे मानवी आरोग्यावरील होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यात विकल्या जाणाऱ्या गुटखा आणि पान मसाल्यात निकोटीन सह अन्यही घातक पदार्थ आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवगळ्या फॉर्म मध्ये राज्यात विविध नावांनी गुटखा विक्री केली जात असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये गुटखा आणि पान मसल्यावर बंदी आहे. त्याचेच अनुकरण करीत आज उत्तराखंड सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.