जामखेड (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर यांनी जामखेड शहरानजीक असलेल्या धोत्री शिवारात मारलेल्या छाप्यात 2 लाख 76 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करत या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला यातील दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे दरम्यान शहरात व तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे सर्रास चालु असताना जामखेड पोलिसाचे या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला येथे येऊन कारवाई करावी लागत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरानजीक जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील धोत्री गावाच्या शिवारात एका इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात हिरा कंपनीचा सुंगधी तंबाखु मिश्रीत पानमसाला गुटखा ठेवला असल्याचे गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व कर्जत विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाली यावरून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला. यावेळी आढळून आलेला तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यानुसार कॉन्स्टेबल सागर जंगम यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले ( २६ ) सचिन निवृत्ती गायकवाड (३१) आणि संजय सुभाष जगताप ( फरार ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून संजय सुभाष जगताप हा आरोपी फरार झाला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास बेरड, पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर, पोलीस कॉन्स्टेबल रुदय गौतम घोडके यांनी केली आहे. पोलिसांनी या कारवाई दोन आरोपीना अटक केली असून २ लाख ७६ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे . पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहे.
शहर व तालुक्यात अवैध धंद्याने जोर धरला असून अवैध धंद्यावर जामखेड पोलिसांची कारवाई कडक कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाले मोकाट झाले असल्याचे चित्र सध्या स्थितीत दिसून येत आहे जामखेड पोलिस याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे तर स्थानिक गुन्हे शाखेला जामखेड मध्ये येऊन कारवाई करावी लागत आहे.