मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीआरपीच्या यादीतही ही मालिका इतर मालिका व कार्यक्रमांना चांगली टक्कर देते. अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांचा त्रिकोण प्रेक्षकांच्या काळजाला चांगला भिडला आहे.
दरम्यान, या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला गुरुनाथ म्हणजेच अभिनेता ‘अभिजित खांडकेकर’ने रसिकांच्या मनात आपल्या अभिनय कौशल्यानं चांगलंच घर केलं आहे. अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी ‘सुखदा खांडकेकर’ ही देखील मालिकेतील शनाया इतकीच सुंदर आणि ग्लॅमर्स आहे.
नुकतंच सोशल मीडियावर अभिजीत व सुखदा यांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. सुखदा सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी आपले आणि अभिजित चे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
अभिजीतने 1 फेब्रुवारी 2013 रोजी सुखदासोबत प्रेमविवाह केला आहे. अभिजीत व सुखदा दोघेही मुळचे नाशिकचे आहेत. सुखदा खांडकेकर उत्तम अभिनेत्री असून, ती कथ्थक नृत्यांगणादेखील आहे.
धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. तसेच दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या गाजलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका तिने साकारली होती.
अभिजीत व सुखदा यांनी अद्याप एकत्र काम केलेले नाही. त्यांचे चाहते त्यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते ? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.