गुरुमाऊली पुन्हा एकसंध

शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदी दुसुंगे, उपाध्यक्षपदी बडाख बिनविरोध
तांबे-रोहकले गटात दिलजमाई
नगर  (प्रतिनिधी) –मागील पाच महिन्यांपूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी काही कारणांमुळे दुरावलेले तांबे-रोहकले गट आज पुन्हा एकदा याच पदांच्या निवडीचे निमित्त साधून एकत्र आले आहेत. आज (दि.5) झालेल्या बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत अध्यक्षपदी तांबे गटाचे संतोष दुसुंगे(नगर तालुका)यांची,तर उपाध्यक्षपदी रोहकले गटाचे नानासाहेब बडाख (श्रीरामपूर)यांची बिनविरोध निवड झाली.

मध्यतंरी दुरावलेले दोन्ही गट परत एकत्र आल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.गुरुमाऊली मंडळ व शिक्षक संघ एक राहावे ही सर्वसामान्य शिक्षक व सभासदांची भावना आहे.त्यामुळेच आम्ही एकत्र आल्याची भावना दोन्ही बाजूंनी यावेळी पदाधिकारी निवडीनंतर व्यक्त करण्यात आली. यावेळी अध्यक्ष दुसुंगे यांनी सर्वाना सोबत घेऊन काम करण्याबाबत भावना व्यक्त केल्या तसेच उपाध्यक्ष बडाख यांनी निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले.त्यांना बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख व दिलीप मुरदारे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, बाळासाहेब मुखेकर, किसनराव खेमनर , विद्युल्लता आढाव, अनिल भवार,सीमा क्षीरसागर, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, अविनाश निंभोरे, राजु मुंगसे ,शरद सुद्रिक, बाबासाहेब खरात, सलीमखान पठाण ,राजु राहणे ,गंगाराम गोडे ,अर्जुन शिरसाट, उषा बनकर ,मंजुषा नरवडे ,सुयोग पवार तसेच शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, प्रवीण ठुबे, विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, दत्तात्रय कुलट, विठ्ठल फुंदे ,बाळासाहेब सरोदे, बाळासाहेब सालके,राजकुमार साळवे ,मच्छिंद्र लोखंडे, बाळासाहेब तापकीर, बाबाजी डुकरे, संजय शिंदे, राम निकम, संभाजी आढाव, बाळासाहेब चाबुकस्वार, आर.टी.साबळे,मंगेश खिलारी,सुरेश निवडुंगे आदी उपस्थित होते. नारायण पिसे यांनी सूत्रसंचालन केले.
काय घडले..काय बिघडले
शिक्षक बॅंकेत एकूण 21 संचालकांपैकी 14 संचालक तांबे यांच्या सोबत,तर 7 संचालक रोहकले यांच्या सोबत होते. यातील तांबे गटातील तीन जणांना बाजूला नेण्याचा प्रयत्न झाला. हे तिघे,रोहकले गटाचे सात असे दहा व तांबे गटातील अजून एक किंवा दोन जणांना असे एकूण अकरा ते बारा जणांना एकत्र आणण्याची जी प्रक्रिया गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरु होती ती आज सकाळपर्यंत सुरु होती. तांबे गटाकडे आज सकाळपर्यंत अकरा संचालक असल्याने ते बहुमताजवळ होते. पण हा आकडा गडबड पण करू शकतो हे लक्षात घेवून तांबे गटाने रोहकले गटाचे सात संचालक आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. त्यामुळे तांबे गटातून जे तीन संचालक बाजूला गेले त्यांना व त्यांना बाजूला नेण्यात जे आघाडीवर होते ते हतबल झाले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत कोणतीच भूमिका न घेता तांबे गटाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतल्याने या निवडी अखेर बिनविरोध पार पडल्या.

मनोमिलनाचे शिल्पकार
तांबे व रोहोकले गट एकत्र यावे ही जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांची भावना होती. ती सातत्याने व्यक्‍त होत होती. त्यामुळे बॅंकेचे संचालक व विस्तारअधिकारी अनिल भवार, बाळासाहेब सालके, बाळासाहेब सरोदे, सलीमभाई पठाण या शिलेदारांनी जोरदार प्रयत्न करत या दोन्ही गटाचे मनोमिलन घडवून आणले.

झारीतले शुक्राचार्य हटविले
शिक्षकांचे नेते कै. भा.द.पाटलांपासून बापू तांबे यांना त्रास देणाऱ्या ज्या नतद्रष्ट मंडळींनी शिक्षक संघटना तोडण्याचे पातक केले ते रावसाहेब सुंबे,कैलास चिंधे व संजय शेळके यांना आजच्या निवडीतून खड्यासारखे बाजूला करण्यात आले आहे. सतत संचालकांना वेठीस धरून बॅंकेतून लाभ मिळविण्याचा हव्यास असणारे हे बॅकेच्या झारीतले शुक्राचार्य आज हटविण्यात आले आहे,अशी प्रतिक्रीया यावेळी डिसीपीएस धारक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष व गुरुमाऊलीचे युवक कार्येकर्ते सचिन नाबगे यांनी व्यक्‍त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here