“गुरूजींनो जिद्द सोडू नका; अनेक पुरस्कार तुमची वाट बघतायत’

ना. विजय औटी : भारत महासत्ता होण्यात शिक्षकांचे योगदान असेल;जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण

नगर  – गुरुजींनो आयुष्यात अनेक पुरस्कार तुमची वाट बघत आहेत.त्यामुळे जिद्द न सोडता गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करत राहा,असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण ना.औटी यांच्या हस्ते आज शिक्षक दिनी झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे,उपाध्यक्षा राजश्री घुले,कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परिहर,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,सदस्य काशिनाथ दाते,सुप्रियाताई झावरे,नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर,विविध शिक्षक संधटनांचे प्रतिनिधी,शिक्षक व त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्वागत व प्रास्तविक प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी केले.
ऑौटी म्हणाले,मी जेव्हा जिल्हा परिषदेत होतो तेंव्हा सदस्यांच्या मागे गुरूजी पुरस्कारासाठी शिफ ारस मागायला मागेपुढे फि रायचे. आता परीक्षेतून निवड होत असल्यामुळे हे प्रकार थांबले असावेत. जे शिक्षक नव्या पिढ्या घडवितात त्यांचीही परीक्षा होते ही चांगली प्रक्रिया आहे.जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा पाया आहे.भारत महासत्ता होण्यात शिक्षकांचे योगदान मोठे असेल.
विखे म्हणाल्या,शिक्षकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.मातीचे मडके घडविण्याचे काम तो करत असतो.यावर्षी अकोले,संगमनेर,राहुरी,राहाता या तालुक्‍यात पुरस्कारांसाठी जोरदार चुरस होती.अवघ्या एक ते दीड गुणांच्या फ रकाने निवडी झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत त्यांनी नाउमेद न होता काम करत राहावे.पुढे नक्की यश मिळेल.

घुले म्हणाल्या,जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व जिल्हा परिषद अत्यंत चांगले काम करत आहे. चांगले विद्यार्थी या शिक्षकांच्या माध्यमातून घडत आहेत. त्यांनी यावेळी ना.औटी यांच्याकडे शाळा खोल्यांसाठी निधीची मागणी केली.भोर यांनी आपल्या भाषणात नगर जिल्ह्याने राज्याला चांगले अधिकारी-पदाधिकारी दिल्याचे सांगत त्यांना गुरुजींनी घडविल्याचे सांगितले. आभार उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांनी मानले.

अकोले तालुक्‍यातून रामनाथ हौशीराम वाकचौरे, संगमनेर तालुक्‍यातून ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ फटांगरे, कोपरगाव तालुक्‍यातून ज्ञानेश्‍वर पांडुरंग सौदाणे, राहाता तालुक्‍यातून शिवाजी पाराजी गायकवाड, राहुरी तालुक्‍यातून विजय सुधाकर कदम, नेवासा तालुक्‍यातील मनीषा एकनाथ लबडे,शेवगाव तालुक्‍यातून रोहिणी प्रभाकर साबळे,जामखेड तालुक्‍यातून काकासाहेब अर्जुन कुमटकर,कर्जत तालुक्‍यामधून श्रीमती छाया भानुदास मुन्ने,श्रीगोंदा तालुक्‍यामधून ताईबाई तुकाराम पवार, पारनेर तालुक्‍यामधून बाळू रेवजी शिंगोटे,नगर तालुक्‍यामधून वैजनाथ विलास धामणे,श्रीरामपूर तालुक्‍यातून राजेंद्र अण्णासाहेब पंडित,पाथर्डी तालक्‍यातून शैलैश संपतराव ढमाळ यांचा समावेश आहे. केंद्रप्रमुख संवर्गातून शिंगवे तुकाईचे केंद्रप्रमुख अशोक घाडगे व जेऊरच्या आशा तुकाराम फणसे या चौदा शिक्षक व दोन केंद्रप्रमुखांना हे पुरस्कार देण्यात आले.

पुरस्कारप्राप्त गुरूजींपेक्षा त्यांच्या पुढाऱ्यांचीच चमकोगिरी जास्त

जिल्हा परिषदेच्या वतीने चौदा तालुक्‍यातील चौदा व दोन केंद्रप्रमुख अशा सोळा जणांना शिक्षकदिनी पुरस्कार देवून गौरविले. मात्र या सोहळ्यात या पुरस्कारप्राप्त गुरूजींपेक्षा त्यांच्या पुढाऱ्यांचीच चमकोगिरी जास्त दिसत होती. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कौतुकापेक्षा आपले अस्तित्व दाखविण्याची केवीलवाणी धडपड सर्वच शिक्षक संघटनांचे पुढारी करताना दिसत होते.

शिंदे-विखे गुलाल घेण्याच्या तयारीत व्यस्त

कार्यक्रमाचे उदघाटक गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे व पालकमंत्री राम शिंदे या पुरस्कार सोहळ्यास नियोजीत कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत,असे शालिनीताई विखे यांनी सांगितले.तो धागा पकडत ना.विजय औटी यांनी,कदाचित ते दोघे 2019 च्या विधानसभेचा गुलाल घेण्याच्या तयारीत व्यस्त असावेत अशी कोपरखळी मारली.

कोपरगाव तालुक्‍यातील शिक्षक अत्यंत चांगले काम करत आहेत. शिष्यवृत्तीत तालुक्‍यातील शंभरहून अधिक विद्यार्थी झळकले आहेत.मात्र शिक्षक संघटना याठिकाणी राजकारण आणत आहेत. पदाधिकारी कधीही शिक्षकांच्या विरोधात नव्हते व नसतील.त्यामुळे संधटनांनी प्रसारमाध्यमांकडे जाताना भान ठेवावे.

शालिनीताई विखे अध्यक्षा, जिल्हा परिषद

Leave A Reply

Your email address will not be published.