गुरुंजवळ बसून मेहनत आवश्यक – उस्ताद उस्मान खान (गुरुपौर्णिमा विशेष)

भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये कर्नाटकी संगीत आणि उत्तर हिंदुस्तानी संगीत असे दोन प्रवाह आहेत. त्यात उत्तर हिंदुस्तानी संगीतात गायनासामावेत तानपुरा घेतात. त्याच्या सारखीच दिसणारी परंतु तंतू वाद्य असलेली ती म्हणजे सतार. भारतीय शास्त्रीय संगीतात सतार वादनाला महत्व आहे याच कारण हेच की, रियाझ मेहेनत आणि उत्तम वादनाची पद्धत आणि तिचा विस्तार आणि त्यासाठी लागणारी मेहनत परंतु ती मेहनत गुरुसमवेत केली तर जास्त उत्तम, असे उस्मान खान सांगतात.

गुरु शिष्य परंपरेमध्ये संगीतात परंपरा टिकवून नवीन प्रवाहाने आपला रियाझ आणि श्रुती नाद या संगीतातील बाबींचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. गुरुजवळ बसून अधिकाधिक रियाझ वादनातील बारकावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गुरु उत्तम आणि जाणकार असला तरच शिष्याची तालीमही उत्तम होते. मी स्वतः देशोदेशी फिरलो आहे तेंव्हा जाणवते की, तिकडे आपल्या भारतीय संगीताचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे अनेक शिष्य तयार करणे आणि चांगले खरे गुरु बनणे ही आपली नैतिक आणि सांगीतिक जबाबदारी आहे. गुरुजवळ बसून विद्या ग्रहण करून स्वत:च्या सांगीतिक विचाराने तो अभ्यास आणि रियाझ वाढविणे हे गुरु शिष्य परंपरेमध्ये महत्वाचे आहे, ज्यात वीणेचा इतिहास आणि प्रत्येक रागाचा अभ्यास हात कसा वळवावा आणि रियाझ करावा याची बारकाईने तालीम घेणे गरजेचे आहे, असे खान म्हणाले.

पुण्यात उस्मान खान यांची नाद विद्यामंदिर संस्था आहे. तिथे सर्व वयाच्या लोकांना संगीताचे शिक्षण देतो कारण आज आयटी, कॉमर्स सारखेच संगीताचे प्रशिक्षण देखील महत्वाचे आहे. स्त्रीचा रियाझ त्यातील बारकावे हे बैठकीतून कळतात. त्यासाठी रियाझ सातत्य आणि मेहनत घेण्याची तयारी हवी एकनिष्ठपणे सातत्याने तीच तीच धून वाजवणे तिचा बारकाईने अभ्यास करणे हे जास्त गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महत्वाचे म्हणजे शास्त्रीय संगीत हे साधायचे असते आणि ते साधनेतून साधते; परंतु त्यासाठी रियाझात आराधना आणि मेहनत करण्याची तयारी हवी जसे उत्तम शिष्य घडतात. उत्तम आणि खरे गुरु देखील असणे ही काळाची गरज आहे. आपली संकृती परंपरा टिकविण्यासाठी आपल्या संगीताचे जतन आणि जोपासना करणे गरजेचे आहे, असे खान यांना प्रकर्षाने वाटते.

आपण कुठेही कोणत्याही देशात शहरात वाजवले तरी आपल्याला एक भारतीय आणि भारतीय संगीताचे कलाकार म्हणून ओळखले जाते. त्यात आपण आपले शास्त्रीय वादन गायन टिकवणे हे गरजेचे आहे. मुळात तुझी कला उत्तम माझी कमी  महान कलाकार तू छोटा हा भेद करू नये संगीतात खुलू द्यावे आणि उत्तम संस्कार करावे. जे आहे ते एक निष्ठपणे आणि मनापासून साकारात्मक्तेनी प्रकट करून गुरूंच्या मार्गदर्शनाने केल्यास नक्कीच यश मिळते, असे ते म्हणतात.

– तन्मयी मेहेंदळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)