लुधियाना – संयुक्त किसान मोर्चातील एक नेते गुरनामसिंग चदुनी यांनी स्वताचा एक वेगळा राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा नुकतीच केली आहे.
या पार्श्वभूमीवर पंजाबातील शेतकऱ्यांच्या 32 संघटनांनी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करणार नाही असे स्पष्ट केले आहे. लुधियानाजवळील मल्लनपुर दखा येथे या 32 संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
त्यात हा निर्णय घेण्यात आला. गुरूनामसिंग चदुनी यांनी जो राजकीय पक्ष स्थापन केला आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे असे या संघटनांनी म्हटले आहे.
दरम्यान पंजाब सरकाकडून अन्य काही मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत, त्यासंबंधात आम्ही त्यांच्याशी चर्चा करू इच्छितो, तथापि त्यांच्याकडून या विषयी स्वतंत्र निमंत्रण आले पाहिजे असे या संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे.