यंदा कलर्सवरील शो ‘डान्स दिवाने’ने विविध वयोगट व पार्श्वभूमींमधील स्पर्धकांच्या उल्लेखनीय नृत्याविष्कारांना सादर करत डान्सप्रती खरी दिवानगी दाखवली आहे. यापैकीच एक स्पर्धक आहे सहा वर्षांची गुंजन.
तिने तिच्या अद्वितीय नृत्य व अविरत स्वॅगसह परीक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सतत उल्लेखनीय परफॉर्मन्सेस सादर करत तिने अतिथी परीक्षक नोरा फतेहीकडून हिप-हॉप क्वीनचा मान मिळवला आहे. तिच्या या चमकदार यशामध्ये अधिक भर म्हणजे मागील एपिसोडमध्ये तिची प्रशंसा करत धर्मेश यांनी तिला खास मानवंदना दिली.
मागील एपिसोडमध्ये गुंजनचे अतिथी मेन्टॉर व लोकप्रिय कोरिओग्राफर रूएल यांनी ‘मेरे गल्ली में’ गाण्यावर नृत्य सादर केले होते. रूएल यांनीच या गाण्याचे मूळ नृत्यदिग्दर्शन केले आहे. पुन्हा एकदा ही जोडी ‘तुझको मिर्ची लगी तो’ गाण्यावर परफॉर्म करताना आणि त्यानंतर माधुरी यांची आयकॉनिक शिटी पाहायला मिळणार आहे.
या एपिसोडसाठी अतिथी असलेले सिद्धार्थ शुक्ला म्हणाले, ”तू फक्त हिप-हॉप क्वीन नसून डान्सिंग क्वीन देखील आहेस. प्रेक्षक म्हणतात की, तू टॉप 8 किंवा टॉप 3 मध्ये असली पाहिजेस, पण माझ्या मते, तू या शोची विजेती असशील.” ते तिला त्यांचा हिप-हॉप ग्रुप “आय ऍम हिप हॉप’चा भाग होण्यास विनंती करणार आहे, ज्यासाठी ते तिचा त्यांच्या डान्स टीमसाठी असलेल्या गिअर किटसह सन्मान करणार आहेत.