ओतूर – आळेफाटा (ता. जुन्नर) येथील श्री जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थांयलड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
थायलंड येथे रविवार (दि. 22) ते मंगळवार (दि. 24) या कालावधीअ पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “पामा ग्लोबल अबॅकस आणि मेंटल अरिथमेटीक स्पर्धेत गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी सचिन खोंड, अर्णव संतोष भुजबळ, प्रद्युम्न प्रशांत जाधव या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
थायलंड येथील या स्पर्धेत 24 देशातील 580 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये भारता तर्फे 78 विद्यार्थ्यांनी पामा इंडियाचे अध्यक्ष आणि ए.पी.पी.एल.चे अध्यक्ष आबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधित्व केले होते.
यामध्ये प्रामुख्याने आळेफाटा येथील श्री जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जनार्दन गुंजाळ, सचिव मीना प्रदीप गुंजाळ आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी, अर्णव, प्रद्युम्नने यश मिळवले आहे. त्यांचा या यशाबद्दल स्कूलच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.