नवी दिल्ली : येथील विधानसभा निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या असताना देखील राजधानी दिल्लीतील धक्कादायक घटनांचा क्रम काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिल्लीच्या शाहीन बागेमध्ये सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये आज अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उजव्या संघटनांची एक युवा कर्यकर्ता बुरखा परिधान करून आज शाहीन बागेतील आंदोलनात घुसली. सदर युवती शाहीन बागेतील आंदोलनाचे चित्रीकरण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थितांनी तिच्याकडे विचारपूस केली असता सदर युवती उजव्या संघटनांशी निगडित असून तिचे नाव गुंजा कपूर असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे गुंजा कपूर ही उजव्या विचारसरणीची राजकीय विश्लेषक असून तिच्या ट्विटर पोफाईलला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील फॉलो करतात.
दरम्यान, गुंजा कपूर हिला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. शाहीन बागेमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाला एक आठवडा देखील उलटला नसताना आता आजचे ‘बुरखा’ प्रकरण उघडकीस आल्याने समाज माध्यमांवर याबाबतची चर्चा सुरु आहे.
Delhi Police: Questioning of political analyst Gunja Kapoor is underway; She wore a ‘burqa’ and went to the protest site at Shaheen Bagh. #Delhi https://t.co/votv4BbBGA
— ANI (@ANI) February 5, 2020