गोंदवले – किरणा मालाच्या दुकानात गांजा विक्री करणाऱ्या दहिवडी येथील व्यापाऱ्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. महेश महादेव इदाते (वय 43) असे गांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे पावणे पाच किलोचा अंदोजे 15 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी, दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गोपनीय माहितीच्या आधारे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडणेरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली
दहिवडी शहरात गणपती मंदिराजवळ राहणारा महेश महादेव इदाते हा आपल्या किराणा मालाच्या दुकानात गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी इदाते याच्याकडे सुमारे पावणे पाच किलोचा अंदाजे 15,000 रुपये किमतीचा गांजा मिळून आला. याप्रकरणी महेश इदातेविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पाटील, सपोनि राजकुमार भुजबळ, पीएसआय प्रमोद दीक्षित, एएसआय देवानंद तुपे, हवालदार यशवंत जामदार, पोलीस नाईक रविंद्र बनसोडे, प्रमोद कदम, यशदा मोरे, गजानन वाघमारे यांच्या पथकाने केली.