गुलशन कुमार यांची मुलगी करणार बॉलीवूड डेब्यू

प्रसिद्ध भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असून दही चिनी असे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. तर, या चित्रपटात ती अभिनेता आर. माधवनच्या अपोझिट दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अश्विन नील मणी हे करणार आहेत.

सिनेमा अँड ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्‌वीट करून याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी सिनेमाने फर्स्ट पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये माधवन आणि खुशाली हे दोघही दिसत आहेत. फोटोमध्ये माधवन हसताना दिसत आहे यात त्याने पिंक कलरचा शर्ट आणि व्हाईट टी शर्ट घातला आहे. तर खुशाली त्याच्या डोक्‍यावर हात ठेवून उभी असलेली दिसत आहे. फोटोमध्ये खुशालीने ब्लू कलरचा कट-स्लीव्हस ब्लाऊज आणि सुंदर साडी नेसली आहे.

तिने न्यूड मेकअपसोबत ब्लॅक कलरची छोटी टिकली लावली आहे. यात खुशाली खूपच सुंदर दिसत आहे. तर पोस्टरमध्ये मागे भोपाळ न्यायालय दिसत आहे.खुशाली ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्‍टिव्ह असते. तसेच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 4 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)