‘ऑस्कर पुरस्कारा’च्या शर्यतीतून ‘गली बॉय’ चित्रपट बाहेर 

मुंबई – रणवीर सिंह आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गली बॉय’ चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत होता. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली होती.

यातच मिळालेल्या माहितीनुसार, मात्र आता चित्रपट शर्यतीतून बाद झाला आहे. द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सकडून परदेशी विभागात शेवटच्या दहा चित्रपटांची नावं जाहीर करण्यात आली. या अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत ‘गली बॉय’चा समावेश नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी “गली बॉय’ चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेला होता तेव्हा, दिग्दर्शक झोया अख्तर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत भारतीय चित्रपट आणि “गली बॉय’ला ऑस्कर मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.