गल्ली बॉय माझ्यासाठीच – रणवीर सिंह

सध्याच्या काळातील आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह हा आगामी चित्रपट “गल्ली बॉय’ च्या प्रचारात गुंग आहे. हा चित्रपट बर्लिन वर्ल्ड प्रिमीयरसाठी निवडला गेला आहे. या चित्रपटावरून तो खूप उत्सुक आहे. तो म्हणतो, जर या चित्रपटात माझ्या जागी कोणी अन्य असले असते तर मला वाईट वाटले असते. मला या चित्रपटात गप्प राहायचे आहे. एवढेच नाही तर शुटिंग झाल्यानंतरही मी कधीही मॉनिटरवर माझे दृष्य कसे झाले आहे, हे पाहिले नाही. परंतु अलीकडेच दिग्दर्शक जोया अख्तरने मला केवळ एक ओळ डबिंगसाठी बोलावले असता मी टिझर पाहून हैराण झालो. चित्रपट खूपच चांगला वाटला. हा चित्रपट तर माझ्यासाठीच आहे, असे मला वाटते, असे तो म्हणतो.

एवढेच नाही तर करण जोहरचा चित्रपट “तख्त’वरून देखील तो उत्साही आहे. तो म्हणतो, करण जोहरबरोबर काम करण्याची इच्छा मला नेहमीच राहिली आहे. त्याने मला कहाणी ऐकण्यासाठी आणि ऑफर देण्यासाठी बोलावले तेव्हा तो मला अत्यंत वेगळाच भावला. अत्यंत सरळ आणि साध्या रूपात मला करण दिसला. प्रथमच एवढा गंभीर करण पाहिला होता. तो एक अत्यंत उत्साही चित्रपट निर्माता आहे, असेही रणवीर सिंह म्हणतो.

Leave A Reply

Your email address will not be published.