Gulkand Marathi Movie: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यातील कलाकार घराघरात पोहोचले. आता या कार्यक्रमातील कलाकार ‘गुलकंद’ या नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने या चित्रपटाचे हटके मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
‘हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे हा नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचे नवीन पोस्ट समोर आले आहे.
View this post on Instagram
एव्हरेस्ट मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘येत्या उन्हाळ्यात सहकुटुंब अनुभवू गुलकंदाचा गारवा… झटकू संसारातली जळमटं, जपू मुरलेल्या नात्याचा गोडवा, सर्वांना शुभ मकरसंक्रांत…. गुलकंद 1 मे पासून सर्वत्र प्रदर्शित एक फॅम-कॉम सिनेमा.’
या मोशन पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा या कलाकारांचे पतंग आकाशात उंच उडताना दिसत आहे. दरम्यान, ‘गुलकंद’ हा सिनेमा 1 मे ला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येईल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. तर लेखक सचिन मोटे हे आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.