मुंबई : शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित करत असून यंदा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होते. आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा पार पडला.
या मेळाव्यातून शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
कावळा कितीही उचीवर गेला तरी तो कबूतर बनत नाही अशी टीका गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे तर वेळ सांगेल असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे काय बोलतात? याची आम्ही शिवसैनिक चातकाप्रमाणे वाट पाहायचो. आज शिवसैनिकांना निश्चितपणाने शिवसेनाप्रमुखांची आठवण येत असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.
“या राज्यात 20 वर्षांपासून मी आमदार आहे. मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले. एक वर्षात 14 वेळेस माझ्या जिल्ह्यात येणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुकदेखील केले.