मुंबई : आयपीएलचा 48 वा सामना आज खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#GujaratTitans have won the toss and they will bat first against #PBKS.
Live – https://t.co/LcfJL3lO5i #GTvPBKS #TATAIPL pic.twitter.com/Dy1oulrRdE
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2022
गुजरात आणि पंजाब या दोन्ही संघांनी आजच्या सामन्यात कोणताही बदल केला नाही आणि जुन्या संघासोबत मैदानात उतरले आहे. गुजरात टायटन्सचा हा आयपीएल 2022 चा हंगाम आतापर्यंत अप्रतिम राहिला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने सलग पाच सामने आणि एकूण आठ सामने जिंकले आहेत. 16 गुणांसह गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत.
तर पंजाब किंग्जसाठी हा हंगाम संमिश्र ठरला आहे. त्यांनी नऊ पैकी चार सामने जिंकले असून 08 गुणांसह गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग-11 :
पंजाब किंग्ज प्लेइंग-11 : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा, राहुल चहर
गुजरात टायटन्स प्लेइंग-11 : शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), बी साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, लोकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी