औंध – गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. या यशाबद्दल पुणे शहरात लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टी औंध तसेच भारतीय जनता पक्ष सदस्य सचिन मानवतकर यांच्या वतीने शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मतदार संघ भारतीय जनता पक्ष अध्यक्ष रवींद्र साळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औंध येथे लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
गुजरात येथील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी केले व गुजरात विधानसभेत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत प्राप्त करून दिले. या भारतीय जनता पक्षाच्या यशाचा आनंद उत्सव फटाक्याचे आतिषबाजी करून तसेच लाडू वाटून औंध येथील परिहार चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या यशाबद्दल कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच हीच गुजरात विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये करायची आहे, असे प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, प्रकाश सोलंकी, नितीन रणवरे, गणेश कलापुरे, अजय दुधाने, सुप्रीम चोंधे, अरविंद पाटील, सुरज गायकवाड, मनोज ठोसर, कैलास ठोसर, अक्षय घडसिंग, अजय नागटिळक, सुनिता निजामपूरकर, सुभद्रा कुंभार तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सचिन मानवतकर मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.